अजित पवार यांनी काजू बी ला हमी भाव देण्याची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली मागणी

अर्चना घारे परब यांनी पवार यांच्याकडे दिले होते निवेदन

सावंतवाडी :
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ.अर्चना घारे यांनी काजू बी च्या हमीभावासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे लक्ष वेधल्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना काजू दिला हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली आहे.
तळ कोकणातील शेतकरी प्रामुख्याने काजू बी , सुपारी, नारळ उत्पादनावर अवलंबून आहे. या काजू – बी ला गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के कमी भाव मिळत आहे. याबाबत राज्य शासनाने ठोस पावले उचलत या शेतकऱ्यांना दिलासादायक असा हमीभाव जाहीर करणे आवश्यक आहे. ज्यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य प्रमाणात उत्पन्न मिळेल. दिवसेंदिवस हवामानात होणारे बदल, गारपीट ,अवकाळी पाऊस यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यात हमीभाव नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास आपण दिलासा द्यावा, अशी मागणी  अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रकाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page