असलदे येथे शिवजयंती उत्साहात साजरी ; लहान मुलांची भाषणे महाराजांचा इतिहास जागवणारी..
*💫कणकवली दि.२०-:* महाराष्ट्रात नव्हे तर देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कोरला गेला आहे. “आमचे दैवत छत्रपती नाही, कुणाची भीती, आम्ही मावळे शिवाजी महाराजांचे” त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही, शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून एक उर्जा आहे. संकटाच्या काळात केवळ शिवाजी महाराजांचे नाव आठवल्यावर मार्ग सापडेल. आयुष्य घडवायचा असेल तर शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे.तरुणांनी शिवचरित्र वाचून आपली जीवनाची कास धरली पाहिजे. बारा पकड जातीला सोबत घेऊन त्याने स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांचा विचारांचा जागर संपूर्ण जगभरात केला जात असल्याचे प्रतिपादन कणकवली सभापती रावराणे यांनी केले. असलदे गावठाण वाडी येथे ग्रामविकास मंडळ व शिवशाही मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते पुष्पहार तर दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले.तसेच कै. विनायक बळीराम परब यांच्या प्रतिमेला राजन चिके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, असलदे सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर,भाजपा उपाध्यक्ष राजन चिके, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, उपसरपंच संतोष परब, पोलीस पाटील सावित्री पाताडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, पत्रकार उत्तम सावंत, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल परब,सुभाष परब, उदय परब, लक्ष्मण लोके, दिलीप डामरे, परशुराम परब, सुरेश मेस्त्री, आत्माराम घाडी, मधुसूदन परब, संतोष घाडी, दिनेश शिंदे, मेहुल घाडी, मेहुल घाडी, तातोबा घाडी, श्यामराव परब, महादेव परब, ज्ञानेश्वर घाडी, सुभाष परब यांच्यासह गावातील ग्रामस्थ मंडळी व महिला लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. जि. प.सदस्य राजन चिके म्हणाले, या मंडळाचा कार्यक्रम सातत्यपूर्वक होत आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे लागेल. शिवाजी महाराजांचा फार मोठा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी निर्माण केले. त्यामुळे शेतकरी दलित कष्टकरी यांना न्याय देण्याची भूमिका शिवाजी महाराजांनी बजावली.त्याच्या काळात स्त्रीचा सन्मान कायम ठेवला, शिवाजी महाराजांसारखे राजा सारखे पुन्हा राजे होऊ शकत नाही. भाजपा उपाध्यक्ष राजन चिके म्हणाले, शिवाजी महाराजांना समोर ठेवून संपूर्ण जगभरात अनेक मोठे नेते त्यांना समोर ठेवून राज्य करत आहेत. शिवाजी महाराज एकच होते ते त्यांच्या सारखा एक राजा पुन्हा होऊ शकत नाही. कदाचित शिवाजी महाराज नसते तर आमची अवस्था बिकट होती. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवचरित्र वाचल्यानंतर अनेक गोष्टी बोलता येतील तो माझ्या आवडीचा विषय आहे,त्यांनी केलेला इतिहास वाचून जरी आपल्या जीवनात बदल घडवला तर मोठा बदल आपण घडू शकतो. पत्रकार भगवान लोके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठा इतिहास रचला आहे. संपूर्ण जगात त्यांचा आदर्श घेऊन सर्व जण काम करत आहेत. बारा पक्कड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली.आपल्या राज्यात त्यांनी शेतकरी, कष्टकरी व सर्व घटकांना समान न्याय देण्याची भूमिका बजावली. त्यामुळेच सर्वधर्मसमभाव ही भावना अस्तित्वात आली आहे.त्यामुळेच शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होऊन गेले. या मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष शिवाजी महाराज जयंती साजरी केली जात आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा नव्या पिढी समोर येत असल्याचा सर्वांनाच आनंद आहे. या कार्यक्रमात आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तातोबा घाडी, मधुसूदन परब तर आभार आत्माराम घाडी यांनी यांनी मानले.या शिवजयंती निमित्त महिलांसाठी हळदीकुंकू, लहानमुलांची भाषणे,संगीत भजने असे कार्यक्रम पार पडले.
