विनामास्क फिरणाऱ्यांना कणकवलीत दणका ;

100 जणांकडून 20 हजार दंड वसूल

*💫कणकवली दि.२०-:* शहरात विना मास्क फिरणाऱ्यांना नगरपंचायत ने दणका दिला असून शनिवारी एकाच दिवशी 20 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर 200 रु दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज कणकवली नगरपंचायत च्या पथकाने शहरात विनामास्क फिरणाऱ्या 100 जणांना दणका देत प्रत्येकी 200 रु दंड वसूल करण्यात आला. एकाच दिवशी 20 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. नागरिकांनी मास्क घालून फिरावे अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल. यापूढेही या कारवाईत सातत्य राखले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

You cannot copy content of this page