आ.नितेश राणे ; भाजपची ताकद राणेना आधी मिळायला हवी होती
⚡सावंतवाडी ता.१०-: नारायण राणे यांनी कधीच बाळासाहेब यांच्याबाबत अनादर केला नाही. हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर बारा वर्षे झालीत. काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही. त्यांना चांगला मास्क लीडर चालत नाही. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची मैत्री आजपासूनची नाही. पहिल्या पासून दोस्तांना आहे. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या आमदारांना भेटायचे नाहीत. पण ठाकरे यांचे पी ए मिलिंद नार्वेकर यांना भेटायचे. वांद्रा पोटनिवडणूकीत नारायण राणे यांना तिकीट दिली गेली. पण या निवडणुकीत नारायण राणे यांना पाडण्यासाठी काँग्रेसचे नेते कामाला लागले होते. या पद्धतीमुळे काँग्रेसची वाताहात झाली आहे. पण आता भाजपची ताकद राणे यांच्या पाठीमागे आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपने दिलेली ताकद नारायण राणे यांना त्यावेळी मिळायला हवी होती, असे प्रतिपादन आ नितेश राणे यांनी केले.
