निलेश राणे; मिश्किल भाषणाने एकच हशा..
⚡सावंतवाडी ता.१०-: मी नारायण राणे यांना अनेक भूमिकेत बघितले. नेता म्हणून बघितलेच. वडील म्हणून पण बघितले, असे सांगतानाच निलेश राणे यांनी एक वर्षापूर्वी साहेब आपली सगळी स्वप्ने पूर्ण झालीत. आता स्वप्नात मला बघा, असे विचारले होते. आताही मला तोच प्रश्न विचारायचा आहे. कारण २०२४ जवळ आली आहे. एक वर्ष मी थांबलो. तुम्ही देशाच्या बॉर्डरची चौकशी करीत असतात. पण आमची सुद्धा चौकशी करा. कारण आम्ही पण बॉर्डरवरच आहोत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आता बॉर्डर जवळ नेत आहेत.
त्यामुळे आत्मविश्वास आला आहे. नितेश राणे रुळला आहे. त्याच्याकडे पाहून वाटते तो खूप वर्षा आसून भाजपमध्ये असल्याचे वाटते. पण माझीच गाडी पुढे जात नाही, अशा भावना भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी वडील नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.
