कोकण शतप्रतिशत भाजपमय करणार …

मंत्री रविंद्र चव्हाण; निलेश राणेचा हात सोडणार नाही..नारायण राणेंना दिला शब्द

⚡सावंतवाडी ता.१०-: पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना नारायण राणे भाजप पक्षात आले. भाजप पक्षात प्रवेश करताना राणे यांनी, आपण ज्या पक्षात प्रवेश केलाय. राष्ट्रीय विचारात प्रवेश केला आहे. त्याची असणारी घटना वाचूनच मी व्यासपीठावर आलो आहे, असे सांगितले. त्याची पुनरावृत्ती त्यांनी आज केली.

आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत परंतु येथे असलेली प्रत्येक व्यक्ती तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे. तुम्ही ज्यांना घडविले ते सर्वजण आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत. कार्यकर्त्यांना आपण मान सन्मान दिल्याने आजही तुम्ही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये राज्य करीत आहात. भारतीय जनता पक्षाने ठरविले आहे. कोकणात शतप्रतिशत भाजपा करण्याचे. मी आज शब्द देवू शकत नाही. पण निलेश राणे यांचा हात तुम्ही माझ्या हातात दिला आहे. तो कधीच मी सोडणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीयमंत्री राणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिला

You cannot copy content of this page