इन्सुली विद्या विकास मंडळ अध्यक्षपदी नरेंद्र मुळीक

सचिव विकास केरकर, खजिनदार राजाराम राणे

बांदा/प्रतिनिधी
इन्सुली येथील विद्या विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवृत्त पोलीस निरीक्षक – अशोक आपा सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी माजी मुख्याध्यापक नरेंद्र केशव मुळीक, सचिवपदी विकास केरकर तर खजिनदारपदी राजाराम राणे यांची निवड करण्यात आली.
संस्थेवर संचालक म्हणून महेंद्र सावंत, महेंद्र पालव, ज्ञानेश्वर राणे, कृष्णाजी कोठावळे, अजय कोठावळे, प्रशांत पेडणेकर, सचिन दळवी, अशोक गवस, जयराम पालव, देवू गावडे, कृष्णा शिवाजी सावंत यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती सौ. मानसी धुरी, माजी अध्यक्ष उमेश पेडणेकर, तंटामुक्त अध्यक्ष रघुविर देऊलकर, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष वासुदेव हळदणकर, न्हानू कानसे, महेश धुरी, दिलीप पेडणेकर, उल्हास सावंत, रविंद्र परब आदी उपस्थित होते.
यावेळी नूतन अध्यक्ष सावंत म्हणाले, आपण याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे. शाळेच्या भौतिक गरजा बरोबर शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी शाळेत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, शाळेला सुसज्ज वाचनालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष त्याचबरोबर डिजिटल वर्ग करण्यावर आमचा भर राहाणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page