बांदा भाजपने मतिमंद शाळेला केले जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

मंत्री राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

बांदा/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा भाजपच्या वतीने कोंडूरा येथील श्री माऊली मतिमंद शाळेला जीवनावश्यक वस्तू तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा उपसरपंच जावेद खतीब, माजी सरपंच अक्रम खान, दीपक सावंत, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, श्यामसुंदर मांजरेकर, मळेवाड सरपंच हेमंत मराठे, ज्ञानेश्वर सावंत, राजू खान, सुनील धामापूरकर, ऍड. खोबरेकर, विलास पावसकर, संदीप बांदेकर, हुसेन मकानदार आदी उपस्थित होते.
यावेळी जावेद खतीब, अक्रम खान, महेश धुरी, हेमंत मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. भविष्यात देखील शाळेतील मुलांसाठी व येथील भौतिक गरजांसाठी आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page