सावंतवाडीतून आमदार होण्याचे राजन तेलींचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही

मंत्री राणेंची सहमती घेवून त्यांनी कणकवलीतून लढावे;शिवसेनेच्या राजन पोकळे यांचा टोला

सावंतवाडी ता.१०-:राजन तेलीचे आमदारकीच स्वप्न हे सावंतवाडीतून कधीच पूर्ण होणार नाही. तेलीनी कणकवलीतून उभे राहून आपले स्वप्न पुरे करावे. त्यासाठी त्यांनी राणेंची देखील सहमती घ्यावी. आम्ही देखील त्यांच्या प्रचाराला येऊ, असा टोला शिवसेनेचे सावंतवाडी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे लगावला.

दरम्यान भाजपचे सध्या सावंतवाडी मतदारसंघात सुरू असलेल्या महाविजय अभियानामध्ये तेली हे सातत्याने केसरकर यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे त्यांचं हे अभियान केसरकर यांच्या विरुद्ध असल्याचे दिसत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

श्री पोकळे पुढे म्हणाले, विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचे महा विजय अभियान सुरू आहे पक्षाची ध्येय धोरणे कार्य जनतेपर्यंत पोहोचवणे हे राजन तेली यांचे कर्तव्य आहे याबद्दल आमचे काहीही दुमत नाही मात्र उटसुट अभियानाच्या माध्यमातून मंत्री केसरकरांवर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम ते राबवित आहे राजन तेली यांची ही भोगसनिती असून सावंतवाडीतील आमदारकीचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे त्यांची ही धडपड आहे मात्र सावंतवाडी शहरात इमारत उभी केली म्हणून सावंतवाडीकर त्यांना कधीही जवळ करणार नाहीत त्यांनी आपले स्वप्न जन्म झाला त्या मतदारसंघातून पहावे तिचा धर्म म्हणून वेळप्रसंगी आम्हीही तुमच्या प्रचाराला येऊ, मंत्री केसरकर यांनी जिल्हा विकासासाठी दिलेले योगदान जनतेला ठाऊक आहे त्यामुळे सलग तीन वेळा जनतेने प्रेमाने त्यांना निवडून दिले राजन तेली यांनी राजकीय कोलाट्या मारून अनेक उद्योग केले परंतु त्यांचा पराभव करून इथल्या जनतेने त्यांना लाथाडले ही त्यांची पोट दुखी असून कुठल्याही प्रकारे केसरकर यांना बदनाम करण्याची संधी ते सोडत नाही.


श्री पोकळे पुढे म्हणाले, आम्ही युतीचा धर्म पाळून गप्प आहोत मात्र त्यामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र काही झाले तरी आम्ही युतीचा धर्म पाहणार मात्र तेली यांच्याकडून टीका होत राहिल्यास आम्ही गप्प न बसता वरिष्ठांकडे तक्रार करू, जिल्ह्यातील विकास कामेही पालकमंत्र्यांच्या सहीने मंजूर होतात असे तेली सांगत आहेत. मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री हा शासनाचा वैधानिक प्रतिनिधी म्हणून त्यांच्या मंजुरीने हा निधी वितरित करण्यात येतो याचा अर्थ तो कोणा एका पक्षाचा नसून विद्यमान युती सरकार असल्याने भाजपा बरोबर शिंदे सरकार म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून आला आहे मंत्री केसरकर हे मुंबई व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या शिफारस व सहीने हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे मग याचे सर्व श्रेय मंत्री केसरकर यांना देणार आहात का ? श्री तेली यांचा सर्व इतिहास, जिल्हा बँकेतील उद्योग, जनतेला ठाऊक आहे मात्र मंत्री केसरकर यांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याची सूचना आम्हाला दिल्याने आम्ही गप्प आहोत यापुढे त्यांनी काही टीका केली तरी त्या टीकेला आम्ही उत्तर देणार नाही.

चौकट
मग त्याचे श्रेयही पालकमंत्र्यांनाच..

जिल्ह्यातील विकास कामे ही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात सहीने मंजूर होत आहेत असे राजन तेली वेळोवेळी सांगत आहेत मग कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत राबवलेल्या विकास कामांचे श्रेय त्यांचे नसून पालकमंत्र्याचे असल्याचा त्याचा अर्थ होतो. असा चिमटा यावेळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी काढला.

यावेळी अशोक दळवी, प्रेमानंद देसाई, अँड.नीता सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page