कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे केंद्रातील कामगार हतबल

मनसे सरचिटणीस गजानन राणे यांनी दिले असोसिएट डीन डॉ हळदवणेकर यांना निवेदन

⚡सावंतवाडी ता.०९-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मुळदे केंद्राला मनसेच्यावतीने येतील मुळदे गावातील रहिवाशी कामगारांच्या जमिनी कृषी केंद्रासाठी घेण्यात आल्या आहेत परंतु त्या कामगारांना कायमस्वरूपी सामावून घेण्यात आले नाही हे कामगार लाल मस्टर कार्यरत होते परंतु त्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता लाल मस्टर बंद करून रोजंदारी स्वरूपात समाविष्ट करण्यात आले. मुळदे कृषी केंद्रात काही कामगार 25 ते 30 वर्ष कार्यरत असून त्यांना कोणत्याही प्रकारची कामे करतानाची सुरक्षा यंत्रणे दिली जात नसून कामगारांना काम करताना कोणतीही इजा झाल्यास विद्यापीठाकडून उपचारासाठी कोणतेही वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जात नाही यामुळे असंख्य कामगार हतबल झालेले आहेत सदर कामगार काल मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्याकडे तक्रार घेऊन आले व त्याची तात्काळ दखल घेत आज मनसेच्या शिष्टमंडळाने मुळदे येथील बाळासाहेब कृषी केंद्र कॉलेजला धडक दिली व कॉलेजचे असोसिएट डिन डॉ प्रदीप हळदवणेकर यांची भेट घेत लेखी निवेदन सादर केले.तसेच सविस्तर याविषयी चर्चा करण्यात आली.

यावेळी मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार म न.वि.से माजी जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ म.न.वि.से कुडाळ तालुका संपर्क अध्यक्ष सर्वेश सावंत प्रवीण गवस निलेश देसाई सिद्धेश माळकर तसेच ग्रामस्थ व कामगार उपस्थित होते .

दरम्यान व्यवस्थापक श्री हळदवणेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू तसेच एक संयुक्तिक बैठक आयोजित करून यावर तोडगा काढू असे चर्चेदरम्यान ठरले व कामगारांना लागणारे साहित्य आपण संस्थेच्या माध्यमातून पुरव असे आश्वासन देण्यात आले यावेळी मनसे पदाधिकारी कामगार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page