वेंगुर्ले भाजप आणि मठ ग्रामपंचायतीच्या नेत्र, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

केंद्रीयमंत्री राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले उद्घाटन

⚡वेंगुर्ले ता.१०-: केंद्रीय मंत्री नारायणराव राणें यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप वेंगुर्ले व मठ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मठ येथील स्वयंभु मंगल कार्यालय येथे मोफत नेत्रचिकीस्ता व मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , मठ सरपंच सौ.रुपाली नाईक , महीला मोर्चाच्या सौ.स्मिता दामले, जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , उपसरपंच महादेव गावडे , युवा नेते अजित नाईक , नेत्रचिकीस्ता अधिकारी आर.बी.तेली , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व दशरथ ( भाऊ ) गडेकर , शक्तीकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर , ग्राम.पं.सदस्य संतोष वायंगणकर व शमिका धुरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्घाटन पर मार्गदर्शन करताना मनिष दळवी म्हणाले की वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम केले जातात , परंतु नेत्रचिकीस्ता शिबीर आयोजित करून नविन दृष्टी देण्याचे पुण्ण्याचे काम या शिबीराच्या माध्यमातून केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले . तसेच भाजपा च्या माध्यमातून भविष्यातही असेच लोकपयोगी उपक्रम आयोजित करावे असे आवाहन केले.

शिबीराच्या उद्घाटनानंतर मठ सरपंच रुपाली नाईक व महीला अध्यक्षा स्मिता दामले व उपस्थित महीलांच्या हस्ते केक कापून नाम.नारायणराव राणे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .

यावेळी मठ बुथ प्रमुख अनिल तेंडोलकर व उमेश धुरी , महेश धुरी , प्रशांत बोवलेकर , नितिश कांबळी , सुरेश धुरी , स्वप्नील धुरी , लक्ष्मी परब , प्रकाश मोबारकर , कविता घोलेकर , नारायण सावंत , समीर नाईक , प्रसाद मठकर , पपु मठकर , कानु गावडे , सुकन्या तेंडोलकर , सुनील गावडे, जगन्नाथ धुरी इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र खानोलकर यांनी केले .

You cannot copy content of this page