डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणाभूमी संवर्धन समितीने गठीत केलेल्या समितीची २१ रोजी सभा…

*💫सावंतवाडी दि.२०-:* जानेवारी महिन्यात झालेल्या व्यापक बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी प्रेरणाभूमी संवर्धन समितीने अस्थायी स्वरुपात गठीत केलेल्या समितीची सभा रविवार २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी समाजमंदिर येथे समितीचे अध्यक्ष मा. डी. के. पडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन व मंजूरी, जमाखर्च वाचन व मंजूरी, आर्थिक व्यवहारासाठी धर्मादाय संस्थेची मंजूरी घेणे, समितीचा विस्तार करून त्याला स्थायी रूप देण्याचे धोरण ठरवणे, संवर्धन समितीच्या अभियान आरंभाचा कार्यक्रम ठरवून नियोजन करणे, कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी आवश्यक समित्या तयार करणे, आर्थिक नियोजन करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सभेस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी प्रेरणाभूमी संवर्धन समिती सिंधुदुर्ग अध्यक्ष डी. के. पडेलकर व सचिव प्रकाश जाधव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page