⚡मालवण ता.०९-: मालवण कुंभारमाठ येथील प्रगतशील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय आदर्श युवा आंबा बागायतदार पुरस्कार जाहीर झाला आहे.
कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार श्री उत्तम फोंडेकर यांनी यापूर्वी तीन वर्षे राज्यात पहिली हापूस आंब्याची पेटी पाठवली होती. जपानच्या वांग चूक या आंबा बागायतदाराचे रेकॉर्ड खंडित करण्याचा पराक्रम उत्तम फोंडेकर यांच्या नावावर नोंद आहे. श्री फोंडेकर यांची आंबा उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेऊन सावंतवाडीच्या ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा आदर्श युवा आंबा बागायतदार हा पुरस्कार उत्तम फोंडेकर यांना जाहीर झाला आहे.
उत्तम फोंडेकर यांना यापूर्वी दिल्ली येथील आयकॉनिक अवॉर्ड कार्यक्रमात दि प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाला आहे . तसेच इतर अनेक संस्थाकडून देखील फोंडेकर यांना पुरस्कार बहाल करण्यात आले आहेत. यावर्षी फोंडेकर यांना ज्ञानदीप मंडळाचा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
