बबन साळगावकर; पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन…
सावंतवाडी
पर्यटन नगरी अशी ओळख असलेल्या सावंतवाडी शहरांमध्ये स्वच्छतेचा आणि पाण्याचा प्रश्न पुढे आला आहे प्रशासकीय काळामध्ये यावर दुर्लक्ष होत असून दोन्ही प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज मुख्याधिकारी श्री जयंत जावडेकर यांच्याकडे केली.
श्री साळगावकर यांनी आज मुख्याधिकारी जावडेकर यांना शहरातील समस्यांबाबत निवेदन दिले त्यामध्ये शहरातील पाणी प्रश्नावर तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली सद्यस्थितीत शहरातील उंच भागामध्ये नळाला पाणीपुरवठा होत नाही मात्र कर्मचारी तेथे पाणीपुरवठा होत असल्याचे फोटो अधिकाऱ्यांना दाखवून दिशाभूल करत आहेत दुसरीकडे कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढत चालली आहे कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता नसल्याने नागरिकांना साध्या साध्या दाखल्यासाठी अनेक वेळा खेपा माराव्या लागत आहेत ही बाब गंभीर आहे.
