⚡कुडाळ ता.०९-: मुळदे येथे झाडावर चढत असताना अचानक चक्कर येवुन खाली पडून अंजीत अगुस्तुस टोपो रा आसाम सध्या राहणार मुळदे वय ३३ याचा दुर्दैवी मृत्यू झाला . ही घटना मुळदे येथील बेलीयन ग्रीन प्रा.लि.कोकण हेरीटेज रीसॉर्ट येथे रविवारी सकाळी ११ वा. घडली.
मुळदे येथील बेलीयन ग्रीन प्रा. लि. कोकण हेरीटेज रिसॉर्ट या कंपनीमध्ये नारळापसुन निरा काढण्याचे काम केले जाते. अंजीत अगुस्तुस टोपो हा गेले दीड महिन्यापासून कामाला व तेथे राहत होता.बेलीयन ग्रीन प्रा.लि. या कंपनी मुळदे ही सकाळी ६.३० वाजलेपासून कामगार कामाला येतात. त्यात अंजीत अगुस्तुस टोपो हा सकाळी ६.३० वा.चे दरम्याने नेहमीप्रमाणे कामावर आलेला होता. तो आपल्या टॅपींगच्या कामावर येवुन काम पुर्ण करुन परत ९ वा. च्या मानाने आपल्या राहत्या रुमवर चहानाश्ता करण्यासाठी गेला. त्यानंतर परत पुढील कामाकरीता ११ वाजता हजर होऊन झाडावर चढत असताना त्याला अचानक चक्कर येवुन तो खाली पडला. त्यानंतर सर्व कामगारांनी मिळुन त्याला पाणी पाजुन ऑफीसमध्ये बसवले. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटु लागल्याने कंपनीच्याच वाहनाने कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. त्यानंतर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी अंजीत अगुस्तुस टोपो यांना तपासुन ते उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेची फिर्याद कुडाळ पोलिसात प्रथमेश अंकुश भांबिड रा. रत्नागिरी यांनी दिली आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
मुळदे येथे परप्रांतीय कामगाराचा झाडावरून पडून मृत्यू
