सायली मांजरेकर यांना नॅशनल बेस्ट अकॅडमी एज्युकेटर विमेन्स अवॉर्ड

⚡मालवण ता.०९-: पुणे येथे झालेल्या ऑल इंडिया ब्युटीपार्लर असोसिएशनच्या कार्यक्रमात मालवण येथील ब्युटीपार्लर व्यवसायिका सौ. सायली सलील मांजरेकर यांच्या सायली ब्युटीपार्लर अँड अकॅडमीला नॅशनल बेस्ट अकॅडमी एज्युकेटर विमेन्स अवार्डने गौरविण्यात आले. हा अवार्ड सायली मांजरेकर यांना सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक तृप्ती देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याच सोहळ्यात लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सौ.सायली मांजरेकर यांना गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. हे गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट इंटरनेशनल मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद आणि अखिल भारतीय चित्रपट महासंघाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पार्लर असोसिशनच्या उपाध्यक्ष आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष असणाऱ्या सौ. सायली मांजरेकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page