⚡सावंतवाडी ता.०८-:
शहरातील शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या द कोकणी हेरिटेज रेस्टॉरंटचे उद्घाटन आज सावंतवाडी राजघराण्याचे युवराज लखन सावंत भोसले,युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांच्या शुभहस्ते या रेस्टॉरंटचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांकडून देखील शुभेच्छा देण्यात आले.
दरम्यान घरगुती जेवणाची मेजवानी ग्राहकांना मिळणार आहे, जमिनीवर बसून जेवायची खास भारतीय बैठक व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असून आजारी माणसांना लागणारी उकड्या तांदळाची पेज, रव्याची कणेरी,आधी अन्य पदार्थही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रेस्टॉरंट चे सर्वेसर्वा परीक्षित आणि पालकर फॅमिलीकडून सांगण्यात आले.
तसेच उद्घाटनानिमित्त ग्राहकांना आज कणकवली येथील सिंगर संजय कदम यांचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.जुन्या मुंबई गोवा हायवे ला लागून मोती तलावाच्या समोर असलेल्या मुलींचे वस्तीगृह नजीक हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे.
याबाबत परीक्षित आणि पालकर फॅमिली कडून सांगण्यात आले की, ग्राहकांना आवडणारे कोंबडी वडा याचबरोबर माशांचे विविध मेनू या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे याशिवाय आजारी व्यक्तींना घरपोच सुविधाही देण्यात येणार आहे उदाहरणार्थ एखादा आजारी व्यक्ती घरात एकटाच राहत असल्यास त्याला लागणारी उकड्या तांदळाची पेज, रव्याची कणेरी मेथीची भाजी अन्य पालक भाज्या व आवश्यक सर्व पदार्थ ऑर्डर नुसार घरपोच देण्यात येणार आहे याशिवाय रेस्टॉरंट मध्येही उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा चे आवाहन त्यांनी केले आहे.
