कोकणातील पहिल्या इनक्युबेशन सेंटरचे कणकवली येथे ९ एप्रिल रोजी उदघाटन
⚡कणकवली ता.०७-: कोकणातील पहिल्या शासनमान्य इनक्युबेशन सेंटरचे कणकवली येथे ९ एप्रिल रोजी उदघाटन होणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. त्याचप्रमाणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी कणकवली विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या गरजू मुलींसाठी मोफत सायकल योजना सुरु करत आहे. तसेच त्याचबरोबर नवनवीन उद्योजकांना आपल्या संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी कोकण भूमी टी बी आई फाऊंडेशन “बिजनेस इनक्युबेशन सेंटर” नव उद्योजकांसाठी काम करेल या दोन्ही उपक्रमांचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या होणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत आम. नितेश राणे बोलत होते.सिंधुदुर्ग जिल्हयात सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने कोकणातील पहीले बिजनेस इनक्युबेशन सेंटर कोकण भूमी टी बी आई फाऊंडेशन या सेंटरचा उदघाटन सोहळा रविवार ९ एप्रिल २०२३ रोजी वाजता केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.हे बिझनेस इनक्युबेशन सेंटर हे भारत सरकार मान्यताप्राप्त सेंटर म्हणून चालु करत आहोत, हा इन्स्टीटयुट एम एस एम ई विभागांर्तगत होस्ट इन्स्टीटयुट म्हणून नोंदणीकृत आहे. या अंतर्गत एम एस एम ई विभागामधुन जाहीर होणा-या सर्व योजनांकरीता लागणा-या सर्व सोई सुविधा व मार्गदर्शन ” या सेंटर होणार असल्याचे आ.नितेश राणे यांनी सांगितले.
कणकवली देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांमध्ये जेव्हा मुली शाळेकडे जातात.त्यांना शाळेत पोहचण्याची अडचण होते.काही शाळा दूर असल्याने पालक मुलींना पाठवत नाहीत किंवा रात्री उशिरा होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने पाहून मुलींना शाळेत पाठवले जात नाही .माझ्या मतदार संघातील शिक्षणापासून मुली वंचित राहू नये, यासाठीच कणकवली विधानसभा क्षेत्रातील शालेय युवतींना मोफत सायकल वाटप योजना १० एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे
जिल्ह्यातील शिक्षण विभाग आणि प्राथमिक विभागाकडून कणकवली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात गरजू मुली किती शिकत आहेत? ज्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी सायकलची आवश्यकता आहे .त्याची अधिकृत यादी शासनाकडून घेतली जाणार आहे.प्राथमिक आणि माध्यमिक मुली किती शिकतात? आकडेवारी घेत आहे.गरजू मुलींना दोन चाकी सायकल शाळेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. मुलीचे शिक्षण पूर्ण झाले की ती सायकल पुन्हा शाळेकडे जमा होईल.ती पुन्हा दुसऱ्या गरजू मुलीकडे सायकल दिली जाईल .दोन टप्प्यात सायकल वितरण केले जाणार आहे.प्राथमिक शाळेसाठी कणकवली १५६,देवगड १५४,वैभववाडी ६९ एकूण ३७९ एवढ्या तर माध्यमिक शाळांमध्ये मुलीची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.त्यामुळे ही योजनेच्या अंमलबजावणीसाठी काटेकोरपणे पाहून सायकल वाटप योजना राबिण्यात येईल.पहिल्या टप्प्यातील १०० सायकल त्या शाळेच्या माध्यमातून सायकल वितरण करण्यात येईल,असेही आ.नितेश राणे यांनी सांगितले.
