⚡मालवण ता.०७-:
इंडियन आईल कंपनी पुरस्कृत टेबल टेनिस आणि ब्रिज प्रशिक्षण शिबीर दि.१४ ते १६ एप्रिल या कालावधीत मालवण टेबल टेनिस अकॅडमी, मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे.
इंडियन आईल कंपनी नेहमीच ग्रामीण भागातील मुलांच्या क्रिडाकौशल्याला वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम पुरस्कृत करत असते. मालवण मध्येही गेली काही वर्षे कंपनी खेळ प्रशिक्षणाचे आयोजन करत आहे. त्याच अंतर्गत या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात भाग घेण्यासाठी विष्णू कोरगांवकर (९४२१२३६४४६ /८०८०२४८२०२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
