ग्रामस्थ १० एप्रिल रोजी छेडणार आमरण उपोषण
सावंतवाडी ता.०५-: शहरातील जिमखाना मैदान जाधववाडी वस्तीवर जाणारा पूर्वापार रस्ता तारेचे कुंपण घालून बंद करण्यात आला आहे हा रस्ता दहा तारीख पर्यंत मोकळा करून न दिल्यास सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर 10 एप्रिल पासून आमरण करण्याचा इशारा जाधववाडी रहिवाशांकडून तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन सुनील जाधव व संजय निगुडकर यांनी तहसीलदार अरुण मुंडे व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले की जिमखाना जाधव वाडी वस्ती कडे जाण्यासाठी पूर्वापर वहिवाटीचा कच्चा रस्ता आहे या रस्त्यावरून आम्ही कुटुंबीय तेजा करीत होतो तसेच चार चाकी वाहनांच्या साह्याने सदर रस्त्यावरून आम्ही घरगुती व दैनंदिन साहित्याची असे घराच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक करत होतो मात्र सद्यस्थितीत हा रस्ता तारेचे कुंपण घालून बंद करण्यात आला आहे त्यामुळे आमच्या सह समाजातील बांधवांवर एक प्रकारे अन्याय झाला आहे तरी सदरचा रस्ता आपल्या अधिकारांमध्ये सुरू करून मिळावा अन्यथा आम्ही समाजातील बांधव दहा एप्रिल पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत.
