पालकमंत्र्यांच्याच सहीने विकास कामे होतात; मात्र काहीकडून जनतेची दिशाभूल

राजन तेली; मंत्री केसरकरांचे नाव न घेता टिका..

⚡सावंतवाडी ता.०५-: पालकमंत्र्याच्या सहीनेच कामे मंजूर होतात त्यामुळे मी विकास कामे मंजूर करून आणली असे सांगून काही लोक या ठिकाणी लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता केला.श्री.तेली आज महाविजय संपर्क अभियान कार्यक्रमात कारीवडे येथे बोलत होते.

तेली पुढे म्हणाले’ जिल्हयात आज झपाट्याने विकास कामे सुरू असून ही कामे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सुरू असताना काही जण फक्त लोकांची दिशाभूल करत असून मात्र सिंधुदुर्गातील जनता ही उशार आहे त्यामुळे लोकांना सर्व गोष्टी समजता असा टोला ही तेली यांनी केसरकर यांना नाव घेता लगावला.

तसेच मोदी सारखे आज देशाला पंतप्रधान लाभे हे खरे खरोच भारतीयांना अभिमानास्पद आहे आज मोदी जे जगातील लोक प्रिय नेते म्हणून एक नंबर आहे.त्यामुळे पुन्हा मोदी सारखे पंतप्रधान होण्यासाठी आपण सर्व एकत्र काम मोदीची योजना तळगाळपर्यत पोहचण्यासाठी व संघटना मजबूत करण्यासाठी एकत्र या असे आवाहन तेली यांनी यावेळी केले.

दरम्यान आपल्या विजय मिळवायच असेल तर भुत सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा असे तेली यावेळी म्हणाले.गावातील विकासासाठी भाजप नेहमी तात्पर्य राहिल असे तेली म्हणाले.

You cannot copy content of this page