तर तुमच्या मनातील आमदार राजन तेली होतील

संजू परब: कारीवडे येथील महाविजय अभियान कार्यक्रमात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यश मिळवून देण्याचे केले आवाहन

⚡सावंतवाडी ता.०५-: भारतीय जनता पार्टीने कामे केल्यामुळे आज नागरिकाचा उस्फूर्त प्रतिसाद मिळतोय, हे आजच्या महाविजय संपर्क अभियान कार्यक्रमात दिसत असल्याचे प्रतिपाद भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी केले. दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जर यश मिळाल तर नक्कीच कार्यकर्त्यांच्या मनातील असलेले आमदार राजन तेली नक्कीच विजयी होतील असे परब यांनी बोलताना म्हणाले. श्री.परब भाजपच्या महाविजय संपर्क अभियान अंतर्गत आयोजित कारीवडे येथील कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी परब यांनी भाजप पक्ष एक नंबर राहिला पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान मोदींच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवून त्याचा लाभ कसा सर्व सामन्याना होईल या उद्देशाने आम्ही हे अभियान सुरू केले आहे. २०२४ ला सुद्धा भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी पुन्हा भाजपच्या पाठशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी भाजप कडून लागणारी मदत आम्ही देऊ असा विश्वास परब यांनी उपस्थितांना दिला.

You cannot copy content of this page