विकास करणाऱ्या महेश सारंग यांना साथ द्या

कोलगाव येथे महाविजय अभियानात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.०५-: आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तुम्ही भाजपच्या पाठशी खंबीरपणे उभे राहा, आशी हाक भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान मागच्या निवडणुकीत महेश सारंग यांचा काही मताने पराभव झाला होता, यांची खंत आहे. परंतु कोलगावचा विकास देखील रखडला. त्यामुळे झालेली चुक परत करू नका. विकास करणाऱ्यांच्या मागे उभे राहा, असे तेली बोलताना म्हणाले. तेसच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना ही तळगाळातील लोकांपर्यंत पोहचत नाहीत. त्या त्याच्यापर्यंत पोहण्यासाठी हे महाविजय जन संपर्क अभियान राबविण्यात येत असल्याचे तेली म्हणाले. ते कोलगाव मतदारसंघात महाविजय अभियान कार्यक्रमात व्यासपीठावर बोलत होते.

यावेळी तेली म्हणाले काजूला गोव्याच्या धर्तीवर कोकणातील काजू बागायतदारांना हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी देखील आमचे प्रयत्न असल्याचे सांगितले. दरम्यान 565 कोटीची पाण्याची योजना मोदी सरकार ने मंजूर केली. आपल्या माता भगिनींना चांगल पाणी मिळाला पाहिजे. यासाठी भाजपचे प्रयत्न असून असे विविध प्रश्न जनतेचे सोडवण्यासाठी भाजपचे प्रयत्न असल्याचे तेली म्हणाले.

You cannot copy content of this page