विजय अभियान कार्यक्रमात भाजप प्रवक्ते संजू परब यांचे गौरव उद्गार
⚡सावंतवाडी ता.०५-: ज्या सरकारच्या योजना आहेत त्या महेश सारंग यांनी 100 टक्के यांनी कोलगाव विभागात तळागाळापर्यंत पोहचल्या असतील असे गौरोदगार भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी आज येथे काढले. आज भाजप तर्फे महाविजय अभियान कोलगाव विभागातून सुरू करण्यात आले असून यावेळी श्री.परब व्यासपिठावर बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना परब यांनी, केंद्रात व राज्यात भाजपचे सध्या जोमाने विकास काम सुरू आहे. तसेच जनसामान्यांसाठी भाजपने विविध योजना राबविल्या आहेत. त्या लोकांपर्यंत पोहचला की नाही यासाठी आम्ही तुमच्या कडून माहिती घेण्यासाठी आज आलो आहोत. तसेच ज्या काय समस्या असतील तर नक्कीच आम्ही भाजप तर्फे सोडवू असा विश्वास ही परब यांनी यावेळी दिला.
यावेळी अजय गोंदावळे,रवि मडगावकर,प्रमोद गावडे दिनेश सारंग आदी उपस्थित होते.
