मडुरा दशक्रोशीला अवकाळी पावसाने झोडपले…

*💫बांदा दि.१९-:* बांदा, मडुरा दशक्रोशीला आज सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपले. अचानकपणे झालेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांची धांदल उडाली. आवकाळी पावसाने आंबा, काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर मिरची, चवळी ही नगदी पिकेही धोक्यात आली आहेत. ऐन काजू हंगामातच गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

You cannot copy content of this page