किंग्ज ग्रुप महाराष्ट्र तर्फे मालवणात कोविड योद्धयांचा सन्मान…

*💫मालवण दि.१९-:* किंग्ज ग्रुप महाराष्ट्र (सिंधुदुर्ग) यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधित मालवणातील पोलीस, पत्रकार, डाँक्टर, सफाई कर्मचारी यांना कोविड योद्धया म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. किंग्ज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर मालवण पत्रकार समितीला कोविड योद्धा सन्मानपत्राने गौरविले. यावेळी मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य बंटी केनवडेकर, सिद्धेश आचरेकर, संग्राम कासले, उमेश शिरोडकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी किंग्ज ग्रुपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दुर्गेश गावकर, तालुकाध्यक्ष पंकज गावडे, तालुका सरचिटणीस, श्रीराज बादेकर, कार्याध्यक्ष ऋतिक चव्हाण, उपाध्यक्ष संदेश झोरे व सदस्य उपस्थित होते. शिवजयंती निमित्त पोलीस, पत्रकार, डाँक्टर, सफाई कर्माचारी यांना कोविड योद्धा या सन्मानपत्राने गौरविण्यात आल्याचे ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page