*चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरला नेमळे येथे अपघात*

*💫सावंतवाडी दि.१९-:* चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या घळणीला आदळून नेमळे येथे अपघात झाला असून, या अपघातात गाडीच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात चालक रघुनाथ सावंत हे सुदैवाने बचावले आहेत. हा अपघात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page