पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी करणार काम
*💫सावंतवाडी दि.१९-:* युवासेना सावंतवाडी शहर अधिकारी पदी आज विशाल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी ही नियुक्ती केली आहे. यावेळी नवनिर्वाचित युवासेना शहर प्रमुख विशाल सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर , अमेय तेंडुलकर यांचे आभार मानले आहेत. तसेच आपण कै. अरुण सावंत यांच्या प्रेरणेतून त्यांचा वारसा चालवत ८० टक्के समाजकारण व फक्त २० टक्के राजकारण करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. यावेळी आपण शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी युवा सेना पदाधिकारी तथा वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,नगरसेवक बाबू कुडतरकर,नगरसेवीका दिपाली सावंत,वेत्ये उपसरपंच आदी उपस्थित होते.
