*💫सावंतवाडी दि.१९-:* छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पालिकेतील शिवराज्याभिषेक प्रतिमेच्या शेजारी ‘शिवस्तोत्राच’ अनावरण नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सावंतवाडी नगरपालिकेत छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते पालिकेच्या माध्यमातून अंध-अपंग बांधवांना मदतीचा हात देण्यात आला. नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संजू परब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्याची प्रथा गतवर्षी पासून सुरू करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. तर नगराध्यक्ष संजू परब यांनी मनोगत व्यक्त करताना, शिवाजी महाराजांच्या कार्याची महती विषद केली. तर शिवस्मारकाची जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक, उदय नाईक यांसह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शिवस्तोत्राच’ अनावरण
