चोरांनी नेला चक्क जाळ्याचा शिसेकडील भाग चोरून…

चार नौकामालकांची झाली चोरी सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे शिसे, दोरी व जाळ्याचा भाग चोरीस_*

*💫देवगड दि.१९-:* देवगड खाडीकिनारी दुरूस्तीसाठी पसरवून ठेवलेल्या जाळ्यांचा सुमारे ६५० किलो वजनाचा शिसे असलेला भाग कापून चोरून नेल्याची प्रकार घडला असून यामुळे नौकमालकांमध्ये खळबळ उडाली आहे. देवगड किल्ला येथील ईलियास ताज मोहमद होलसेकर यांनी याबाबत तक्रार दिली असून त्यांचा अल्सुमा या नौकेवरील नादुरूस्त झालेली जाळी २८ जानेवारी रोजी देवगड खाडी किनारी पसरवून ठेवली होती. जाळी दुरूस्त करणाèया कामगारांकडून सकाळी ८ ते ५ या वेळेत जाळी दुरूस्त करण्याचे काम सुरू होते.या कामाची होलसेकर हे दररोज पाहणी करीत होते.त्यांच्यासमवेत नौकामालक सहदेव निलकंठ बापर्डेकर, श्रीपाद सदानंद पारकर, द्विजकांत विठ्ठल कोयंडे यांच्या नौकांवरील जाळी दुरूस्तीसाठी पसरवून ठेवण्यात आली होती. होलसेकर हे दि. १४ \ेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता देवगड खाडीकिनारी दुरूस्त झालेली मासेमारी जाळी नौकेत चढविण्यासाठी गेले होते यावेळी जाळ्यांचा शिसे असलेल्या भागाकडील दोरीसह जाळे व शिसे कोणीतरी कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आले. यामध्ये होलसेकर यांचे ३०० किलो वजनाचे २१ हजार रूपये qकमतीचे दोरीसह जाळे, शिसे, सहदेव बापर्डेकर यांचे १०० किलो वजनाचे ७ हजार रूपये qकमतीचे दोरीसह शिसे व जाळे, द्विजकांत कोयंडे यांचे ५० किलो वजनाचे ३,५०० रूपये qकमतीचे दोरीसह शिसे व जाळे,श्रीपाद पारकर यांचे २०० किलो वजनाचे १४ हजार रूपये क किमतीचे दोरीसह शिसे व जाळे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत होलसेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

You cannot copy content of this page