नायब तहसिलदार प्रदिप पवार; मडुरा-सातोसे-सातार्डा रस्त्याची केली पाहणी
*💫बांदा दि.१९-:* सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीने पर्यायी काढलेल्या रस्त्याला कोकण रेल्वेची हरकत असल्याने भविष्यात येथून ये-जा करणाऱ्या हजारो युवक तसेच नागरिकांसाठी रस्ताच उपलब्ध राहणार नाही. जिल्हा परिषद व प्रशासनाने स्थानिकांना विश्वास न घेता रस्ता हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे केवळ दोन ग्रामपंचायतींच्या ठरावामुळे दशक्रोशीतील हजारो नागरिकांना त्रास होत असल्याची बाब माऊली रस्ता संघर्ष समितीने नायब तहसिलदार प्रदिप पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याची ग्वाही श्री.पवार यांनी दिल्यामुळे ‘त्या’ रस्त्याबाबत दशक्रोशीच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. मडुरा, सातोसे, सातार्डा, नांगरसडा, कवठणी, किनळे जुन्या रस्त्याची नायब तहसिलदार प्रदिप पवार यांनी माऊली संघर्ष समिती व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाहणी केली. यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, मंडळ अधिकारी श्री. पवार, गटविकास अधिकारी सी.व्ही.नाईक, लिपीक पी.के.वारंग, सातार्डा तलाठी संदीप मुळीक, जि.प.बांधकाम उपअभियंता अमित कल्याणकर, संघर्ष समितीचे जगन्नाथ पंडित तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
