पाडलोस भागात रेल्वे मार्गावर आढळला अज्ञाचा मृतदेह

⚡बांदा ता.२८-; कोकण रेल्वे मार्गावर मडुरा रेल्वे स्थानक जवळ पाडलोस भाकरवाडी परिसरात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली. संबंधित युवक हा २५ ते ३० वर्ष वयोगटातील असून तो रेल्वेतून खाली कोसळल्याचा अंदाज आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. मात्र अद्याप त्याची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले नाही.

You cannot copy content of this page