पर्यटकांना त्रास देणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही

विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची माहिती

सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून या जिल्ह्यात भारतातून पर्यटक येतात. मात्र जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना कुठेही वाहतूक पोलिस त्रास देत असेल आणि त्याची तक्रार आमच्याकडे आली तर त्यांची गय केली जाणार नाही. त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा कोकण विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यांनी आज येथे दिला आहे.

दरम्यान ऑनलाईन होणारी फसवणूक पासून नागरिकांनी सावध राहावे यासंदर्भात फसवणूक झाल्यास ओरोस येथे स्थापन करण्यात आलेल्या सायबर क्राईमच्या कक्षाला तात्काळ तक्रार करावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

You cannot copy content of this page