“शिवगर्जा” महानाट्य आयोजित केल्याबद्दल केला गौरव..
सावंतवाडी
माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल फाउंडेशन चे सर्वेसर्वा तथा उद्योजक व भाजप युवा नेते विशाल परब यांनी आशिया खंडातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित “शिवगर्जना” महानाट्य भरविल्याबद्दल राज्याचे बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांचे सावंतवाडी येथे एका कार्यक्रमात विशेष कौतुक केले. श्री.परब यांनी जिल्हावाशियासाठी नेहमी असेच कार्यरत रहावे, भविष्यात त्यांना याचे फळ निश्चितच मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
