माजी सभापती रमेश पालव यांचे निधन

⚡मालवण ता.२६-: मालवण तालुक्यातील पोईप वरची पालववाडी येथील रहिवासी आणि मालवण पंचायत समितीचे माजी सभापती रमेश ऊर्फ शांताराम पालव (वय ८०) यांचे आज अल्प आजाराने मुंबई येथे निधन झाले.

पोईप गावचे १५ वर्ष ते सरपंच होते. तर त्यानंतर पाच वर्षे मालवण पंचायत समितीचे सभापती पद त्यांनी भूषविले होते. श्री देव वेताळ मुंजेश्वर देवालय जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष तसेच मालवण तालुका मराठा समाज उपाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम केले होते. सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनचे ते पदाधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page