आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात कार्यक्रम

⚡मालवण ता.२४-: शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण- कुडाळ चे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहरामध्ये दि. २६ मार्च रोजी सकाळी ११ वा. मालवण शहरातील वीज महावितरण मंडळाच्या वायरमन, लाईनमन यांचा सत्कार शिवसेना शाखा मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम दुपारी ३ वाजता शिवसेना शाखा मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.

तरी तालुक्यातील सर्व शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासेना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, महीला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, महीला तालुकाप्रमुख सौ.श्वेता सावंत, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, युवतीसेना कुडाळ मालवण प्रमुख सौ.शिल्पा खोत, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, शहरप्रमुख मंदार ओरसकर, युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख नीनाक्षी शिंदे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page