*मराठा उत्कर्ष मंडळाच्या वतीने सावंतवाडी नगरपालिकेत शिवजयंती साजरी

सावंतवाडी : नगरपालिकेत मराठा उत्कर्ष मंडळ सावंतवाडी, दोडामार्गच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची महती विषद करत इतिहासाला उजाळा देण्यात आला. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीय, धार्मिक तेढ निर्माण होऊ दिली नाही. समाजानं त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा असे मत यावेळी व्यक्त केले आहे. यावेळी दत्ताराम सडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, अभिमन्यू लोंढे, भुपेंद्र सावंत, संतोष सावंत, यशवंत आमुणेकर, सत्यजित धारणकर, रघु धारणकर, टी.व्ही. पाटील, नंदू वारंग, बाळा नमशी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page