आंबोली कबुलायतदार जमीन प्रश्नी दीपक केसरकरांच्या फसव्या भूमिकेचा उद्धव ठाकरे गटाकडून निषेध

⚡आंबोली,ता.२३-: आंबोली कबुलायतदार गावकर प्रश्नी दीपक केसरकर फसवणूक करून येथील प्रश्नाचा खेळ मांडला आहे.१३ वर्षे आमदार खोट बोलून इथल्या जमिनीची खरी विल्हेवाट लावण्यासाठी जबाबदार दीपक केसरकर आहेत.यांनी जर वेळीच प्रश्न सोडवला असता तर वनखात्याला शेकडो एकर जमीन गेली नसती.हा प्रश्न रखडवून आपला स्वार्थ साधून इथल्या जमिनी दीपक केसरकर यांनी बळकावल्या आहेत.त्यामुळे हा प्रश्न रखडण्यास केसरकर जबाबदार आहेत आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे केला.

दरम्यान आतापर्यंत ५० वेळा हा प्रश्न सोडवला असल्याचे जाहीर केले.आंबोली माझे दुसरे घर म्हणून भावनिक करून लोकांना सांगायचे.इथल्या लोकांच्या महिलांना रोजगार देणार,गुळ फॅक्टरी,बिसलेरी कंपनी,चष्मा कारखाना,१०० गायी म्हैशीचे पालन,इथल्या लोकांना रोजगार देणार,आशा खोट्या बतवण्या केल्या.आंबोली आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ करणार अशा मोठ्या मोठ्या घोषणा केल्या.प्रत्यक्षात त्यांना काहीही करता आले नाही.आंबोली पर्यटन स्थळ असल्याने राज्यभरातील पर्यटक येतात त्यामुळे राज्यभरात आंबोली ची नाचक्की झाली आहे त्यामुळे निवडणुकी आल्या की दीपक केसरकरांची नाटके सुरू होतात त्यामुळे इथल्या लोकांना आता कळून चुकले आहे,आपली निष्क्रियता लपवण्यासाठी केसरकरांचा खटाटोप चालला आहे त्यांच्या या भूमिकेचा आंबोली उद्धव ठाकरे गट शिवसेनेने निषेध केला आहे.

उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष विभागीय अध्यक्ष बबन गावडे,बुधाजी पाताडे, प्रकाश गुरव,काशिराम राऊत,सुनील राऊत, डुबा राऊत,नारायण कोरगावकर,अनिल चव्हाण,रूपा गावडे(फौजदारवाडी),दादा कर्पे,संजय पडते,संतोष पडते,लक्ष्मण पटकारे यांनी निषेध व्यक्त केला.

You cannot copy content of this page