बांदा-दाणोली मार्गावर रस्त्याला मधोमध भगदाड…

रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक; तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी…

⚡बांदा ता.२३-: बांदा-दाणोली मार्गावर निमजगा प्राथमिक शाळेसमोर रस्त्याला मधोमध भगदाड पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. मुंबई, पुण्यातून आंबोली मार्गे गोव्यात जाणारे पर्यटक या रस्त्याचा वापर करत असल्याने या मार्गावर वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

याठिकाणी नजिकच प्राथमिक शाळा असून लहान मुले शाळेत ये-जा करतात. तसेच वाहनांची व पादचाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्रीच्या वेळी अंधारात खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर भगदाड बुजविण्याची मागणी होत आहे.

You cannot copy content of this page