असलदेत अनोळखी स्त्री जातीचा अनोळखी मृतदेह आढळला…

सोबत ३ गाऊन आढळले;घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी केला पंचनामा…

*💫कणकवली दि.१९-:* कणकवली तालुक्यातील असलदे येथील ओझर जंगलमय परिसरात एका बागेत एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह अंदाजे ४५ वर्षाचा गुरुवारी दि.१८ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. मृतदेहाची माहिती समजताच कणकवली ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.सदर मृतदेहाची घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह पुढील तपासासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय शवागृहात ठेवण्यात आला आहे.त्यानंतर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी श्रीमती डॉ. रोहिणी सोळुंके यांनी त्या मृतदेहाची रुग्णालयात पाहणी केली,अधिकाऱ्यांना तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की असले गावातील ओझर जंगलमय भागात एका बागेत बेवारस स्त्री जातीचा अंदाजे ४५ वर्षाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सदर मृतदेह पंचनामा करुन ताब्यात घेतला. घटनास्थळी महिलेचा मृतदेह कुजलेल्या नग्न अवस्थेत होता शेजारी तीन वेगवेगळ्या कलरचे गाऊन आजूबाजूला पडलेल्या स्थितीत होते. पंचनामा करून सर्व मिळालेले साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास तो मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी पोलिसांकडून सदर मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम केले जात आहे. जिल्ह्यात नापत्ता असलेल्या महिलांबाबत पोलीस विभागामार्फत शोध घेण्यात येत आहे. त्यादृष्टीने पोलिस अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन फिरस्त्या महिला याठिकाणी कोण होत्या का? कोणाला दिसल्या होत्या का? त्यांच्या अंगावर कोणती कपडे होते? याबाबत चौकशी केली आहे. या घटनेची खबर भगवान सुरेश लोके रा. असलदे यांनी पोलिसात दिली आहे. या घटनास्थळी पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला,पोलीस उपनिरीक्षक जगदीश बांगर, पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे,पोलीस नाईक कैलास इंपाळ ,पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी,रुपेश गुरव,चालक श्री.उबाळे,असलदे सरपंच पंढरी वायगणकर,पोलीस पाटील सावित्री पाताडे, असलदे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कणकवली पोलिसांनी सदर महिलेच्या बाबत कोणाला पत्ता असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page