कुडाळ शिवसेनेच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा सत्कार…

*सांगली जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुखपदी निवडीचे औचित्य_

*💫कुडाळ दि.१८-:* सांगली जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुखपदी आमदार वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्ल कुडाळ शिवसेनेच्या वतीने एम.आय. डी.सी. विश्रामगृह येथे आ. वैभव नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, जीवन बांदेकर, मेघा सुकी, प्रज्ञा राणे, सुशील चिंदरकर, नितीन सावंत, राजू गवंडे, श्रेया गवंडे, सुप्रिया मांजरेकर, कृष्णा तेली,संतोष अडूळकर, स्वप्नील सावंत, यशराज राणे, बाळा राऊळ, किरण शिंदे, अमित राणे, चेतन पडते, संदीप म्हाडेश्वर, चंद्रशेखर बाईत, बाबी बांदेकर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page