*३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान;माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजन
*💫मालवण दि.१८-:* माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त कुंभारमाठ येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून गेली काही वर्षे शासकीय तंत्रनिकेतन शेजारी माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावर्षीही विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी संजय लुडबे, माजी जिल्हा परिषद सदस्या संजीवनी लुडबे, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, शैलेश लुडबे, लीलाधर लुडबे, अनिल गावकर, साईनाथ लोके, मयु लुडबे, नीता लोके, दीप्ती फाटक, अक्षय नरे, दिपू माडये यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. शिबीरास जिल्हा रक्तपेढीचे डॉ. पालव, अन्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
