आई, भावाचा खून प्रकरणी भारत सकपाळ यांना अटक

बापर्ड बौद्धवाडी येथील हृदय पिळवटणारी घटना;देवगड तालुक्यात खळबळ

देवगड(प्रतिनिधी) , घरगुती व जेवण खाणे देत नसल्याच्या कारणावरून आई शोभा मुरारी सकपाळ (७०)व मोठा भाऊ महेंद्र मुरारी सकपाळ,(५६) याना बांबूच्या दांड्याने त्याचे डोकीवर, तोंडावर, हातापायावर व कमरेवर मारहाण करून त्यांना जीवे ठार मारल्याची घटना बापर्डे बौद्धवाडी येथे १३ मार्च साय.५.३० ते १४ मार्च स ६ वाजनेच्या दरम्यान बापर्डे येथील राहत्या घरी घडली .यातील संशयित आरोपी सख्खा भाऊ भारत मुरारी सकपाळ (५१)याला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या घटनेची फिर्याद बापर्डे पोलीस पाटील नितीन घनश्याम नाईकधुरे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे या घटनेमुळे देवगड तालुक्यात खळबळ माजली आहे.घटनास्थळी सरपंच संजय लाड दाखल झाले होते .
पोलीस सूत्रांकडुन मिळालेल्या माहिती नुसार यातील संशयित आरोपी याने २००७ साली आपल्या पत्नीची हत्या केली होती .त्यावेळी त्याला अटक होऊन २०११ साली त्याची निर्दोष मुक्तता झाली त्यानंतर तो गावी होता .१४ मार्च रोजी सकाळी सकपाळ कुटूबीयांचा दरवाजा उघडला न गेल्याने शेजाऱ्यांनी पाहणी केली .त्यावेळी भारत घरात नसल्याचे निदर्शनास आले त्याचा शोध ग्रामस्थांनी नजीकच्या भागात घेत असताना तो एका बागेजवळ आढळून आला त्यांनी घटनेची माहिती दिली त्यानुसार तात्काळ पोलीस पाटील यांनी देवगड पोलिसांना कळविले व देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी आपल्या समवेत पोलीस हवालदार प्रशांत जाधव,पोलीस नाईक अमित हळदणकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश चव्हाण स्वप्नील ठोंबरे यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन संशयित आरोपीला ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही केली.घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे,स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखा पोलीस निरीक्षक संदीप भोसले ,उपनिरीक्षक रामचंद्र शेळके हेही दाखल झाले पुढील पोलीस कार्यवाही करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पोलिस उप अधीक्षक नितीन बगाटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून सविस्तर माहिती घेतली.या घटनेतील आरोपी भारत सकपाळ याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांचे मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page