दीपक केसरकर खोटारडे भाषा मंत्री

रुपेश राऊळ यांचा आरोप : महिन्यामहिन्यात वक्तव्य बदलतात

⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडीतील जनतेला दीपक केसरकर कसे आहेत हे पूर्णपणे माहिती आहे. खोटे बोलण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही हे इथल्या जनतेला कळून चुकले आहे. मात्र आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला समजले की हे तर भाषा मंत्री आहेत. सत्तांतरात त्यांच्याकडील भाषा उपयोगी पडल्याने त्यांना सरकारमध्ये योग्य शिक्षण खात देण्यात आले आहे. केसरकर यांनी प्रत्येक वक्तव्य काही महिन्यात क्षणाक्षणाला बदललेली आहेत. त्यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले की दीपक केसरकर खोटारडे असल्याचा हल्लाबोल ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे.

You cannot copy content of this page