*💫मालवण दि.१६-:* महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर तथा बाबुराव प्रभूगावकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. ही निवड अध्यक्ष कृष्णाजी रांजणे, कार्याध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री, सचिव रेवजी महाराज वाळंजू यांनी जाहीर केली आहे. समाजात एकमेकांविषयी आपुलकी, प्रेम, बंधुभाव, प्रेरित करून समृद्ध, बलशाली भारत निर्माण व्हावा व प्रत्येक व्यक्ती देशभक्तीने प्रेरित होऊन समाज कार्य करेल, असा आदर्श वारकरी घडावा, असे आवाहन अध्यक्ष कृष्णाजी रांजणे यांनी केले. प्रभूगावकर हे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहत आहेत. गावातील धार्मिक, सामाजिक-क्रीडा कार्यक्रमांमध्ये त्यांचे योगदान लाभते.
महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी मधुकर प्रभूगावकर….
