*💫सिंधूदुर्गनगरी दि.१६-:* कुडाळ तालुक्यातील कसबे बौद्धवाडी येथे मुळ राहणारे सध्या राहणार रानबाबुळी बौद्धवाडी येथील संतोष महादेव जाधव (वय34) याचा मृतदेह आज रेल्वे पटरीवर कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. संतोष जाधव हे13 फेब्रूवारी पासून मनोरुग्ण अवस्थेत घरातून निघुन गेले होते. याबाबत त्यांची बहिण सौ रसिका रमेश कदम यानी सिंधूदुर्गनगरी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची खबर दिली होती. दरम्यान, आज सिंधुदुर्गनगरी ते कणकवली रेल्वे पटरी वरील मैल दगड न 329/3 ते 329/4 च्या मध्ये रेल्वे ट्रकच्या बाजूला कुजलेल्या अवस्थेत जाधव याचा मृतदेह आढळून आला. भाचा रणजित रमेश कदम (वय 20) यांनी हा मृतदेह आपला मामा संतोष जाधव यांचा असल्याचे ओळखून पोलीस ठाण्यास खबर दिली.
*रानबांबुळी येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला*
