दुकानाला लागली आग..

55 हजारांचे नुकसान.

*💫कणकवली दि.१६-:* फोंडाघाट ( बावीचे भाटले ) येथील हरी संजय मराठे यांच्या किराणा व स्टेशनरी दुकानाला लागलेल्या आगीत फ्रिजसह अन्य सामान जळून 55 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.ही घटना सोमवार 15 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. मराठे यांनी सोमवारी रात्री आपले दुकान बंद केल्यानंतर रात्री 9 च्या सुमारास दुकानशेजारील घरातील नागरिकांना दुकानातून धूर येताना दिसला.काही वेळातच दुकानातून फ्रिजचा स्फोट होऊन दुकानाला आग लागली. या आगीत मराठे यांचे 55 हजार रुपयांचे नुकसान झाले. फोंडाघाट आउटपोस्ट चे पोलीस हवालदार वंजारी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दुर्घटनेची माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात कणकवलीतील अग्निशामक बंबासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक बंबामुळे रात्री आग आटोक्यात आली.

You cannot copy content of this page