‘त्या’ पुलाचे फुक्याचे श्रेय घेण्यासाठी मायकल डिसोजा यांचा केविलवाणा प्रयत्न

सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांचा आरोप*

*💫सावंतवाडी दि.१७-:* कारीवडे कट्टा पुलासाठी मिळालेली मंजुरी ही ग्रामस्थांनी पुकारलेल्या जलसमाधी आंदोलनाचे फलित असून, मायकल डिसोजा हे फुक्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. सदरच्या आंदोलनावेळी जिल्हा परिषद सदस्य असलेले मायकल डिसोजा हे आंदोलनं स्थळी उपस्थित देखील राहिले नाही होते.असे सांगत मायकल डिसोजा यांनी या पुला संदर्भात कोणता पाठपुरावा केला ते जाहीर करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये, हे श्रेय एका पक्षाचे किंवा एका व्यक्तीचे नसून कारीवडेतील जनतेचे असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page