नगरपालिका प्रशासनाची भाजी विक्रेत्यांवर पुन्हा एकदा कारवाई

*💫सावंतवाडी दि.१७-:* शहरात बाजारपेठेबाहेर बसलेल्या भाजी विक्रेत्यावर आज मुख्याधिकारी यांनी त्यांची तेथील दुकाने हटवून त्यांचे सामान जप्त केल्याने भाजीविक्रेते पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यानी पालिकेत येत मुख्याधिकारी याना घेराव घालत याबाबत जाब विचारलं आहे. आमच्यावरच वारंवार कारवाई करून का अन्याय केला जातो असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच आम्ही नेमके बसायचे कुठे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी मुख्याधिकारी यांच्यासोबत भाजी विक्रेत्यांची चर्चा सुरू आहे. यावेळी प्रशासनाने केलेली कारवाई चुकीची असल्याचे मत भाजी विक्रेत्यांनी मांडले आहे.

You cannot copy content of this page