*पालिका प्रशासन व भाजी विक्रेते वाद चिघळण्याची शक्यता…
*💫सावंतवाडी दि १७-:* नगरपालिका प्रशासनाने आज बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे. यावेळी भाजी विक्रेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. पालिका प्रशासन स्थानिंकांवर अन्याय करून परप्रांतियांना व्यवसाय करण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही भाजी विक्री करून आमच्या मुला बाळांचे शिक्षण देत असून, आमचे पोट देखील यावर आहे. असा टाहो त्यानी फोटला आहे. वारंवार भाजी विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याने भाजी विक्रेते आणि पालिका प्रशासन हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
